मुंबई महापालिका व सिडको तसंच इतर पदांच्या स्पर्धापरीक्षा जाहीर झाल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी पदवीपश्चात ५ वर्षांचा अनुभव बंधनकारक आहे.
पदवी नंतरच्या पाच वर्षांत इतरत्र काम करताना तसंच लग्न -मूलं- संसार हे विषय चालू झाले असल्यास त्यासाठी वेळ देण्यामुळे एका ठिकाणी बसून अभ्यास करण्याची सवय १००% सुटलेली असते. तसंच रोजच्या धावपळीत अभ्यासासाठी वेगळा वेळ काढणे शक्यच होणार नाही. म्हणून स्वतःभोवती अभ्यासाचे वातावरण निर्माण करणं अत्यावश्यक आहे. ते कसं करता येईल?

मुंबईतील बहुतेकांचा वेळ प्रवासात जातो. तसंच काही जण बांधकामाच्या साईट सांभाळत असतील तरीही जागेवर बऱ्यापैकी वेळ असतो. तुकड्यात विखूरलेली ही वेळ साधली तर एका दिवसात कमीत कमी २ तासांपर्यंत वेळ अभ्यासासाठी उपलब्ध होऊ शकतो. माझ्या मते हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
१. तांत्रिक (Technical) विषयासाठी :
वर सांगितलेल्या वेळेचा वापर करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरवरून Civil engineering GATE असं शोधून काही ॲप्लीकेशन्स डाऊनलोड करा. या ॲप मध्ये ५०० हून अधिक प्रश्न आहेत. १० ते २० प्रश्नांच्या या प्रश्नपत्रिका "वस्तूनिष्ठ बहुपर्यायी (Multiple Choice objective) या प्रकारच्या असतील. त्यातील कमीत कमी पाच कोणत्याही प्रकारचा अभ्यास सुरू करण्याआधी सोडवा. यामुळे आपण कुठे आहोत, हे समजण्यास मदत होईल. तसंच प्रश्न कसे वाचायचे व तुमची वैयक्तिक बलस्थानं व कमकूवत भाग (Topics) यांचा अंदाज येईल.

२. बुद्धीमत्ता मूल्यमापन (quantitative aptitude) या भागासाठी :
गूगल प्ले स्टोअरवरून Madguy Softlab यांचं ॲप मिळवा. ॲप( http://madguylab.com/app.php?u=344640 )तसंच quantitative formulas या ॲप मधील एकत्रित सूत्र (Formulas) किंवा इंटरनेटवरून विविध उप विषयांच्या (SubTopics) यांची प्रत छपाई करून त्या आपल्या घराच्या भिंतींवर किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही येता जाता पाहू शकता अशा तऱ्हेने लावा. सूत्रं डाऊनलोड करा. www.careerarm.com/437-quantitative-aptitude-formulas-shortcuts/

अभ्यासाला सुरूवात करताना..
पहीला आठवडा:
१ ते ३० पर्यंतच्या पाढ्यांचं कोष्टक, १ ते २० पर्यंत वर्ग वर्गमूळ, १ ते १० घन घनमूळ यांची छापील प्रत घरात/ कामाच्या ठिकाणी लावा. येता जाता नजर मारून ते "तोंडपाठ" करा. तोंडपाठच करा. बरेच दिवस स्मरणशक्तीला चढलेला गंज काढून टाकण्यास प्रचंड मदत होईल. याशिवाय अतिशय महत्वाची गणिती समीकरणं ही जोडीला चिकटवता येतील. तसंच Brain optimizer या सारखे मोबाईलमधिल गेम्सही अभ्यासात चवीसाठी वापरावेत.

दुसरा आठवडा:
जास्तीत जास्त तांत्रिक (technical )इंग्रजी वाचण्याचा सराव करा. प्रश्न समजण्याचा वेग वाढला तरच वेगाने उत्तरं देता येतात.

तिसरा आठवडा:
प्रवास व कामाच्या ठिकाणी ॲप्लीकेशन्समधून वाचलेल्या प्रश्नांच्या जोडीला खन्ना पब्लीकेशन यांचं अगोर व एस. चंद पब्लीकेशनच्या 'गेट' परीक्षेसाठीच्या पुस्तकांतून अधिकाधिक बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. http://madguylab.com/ या वेबसाईटवर उपलब्ध असलेली ॲप्लीकेशन्स बुद्धीमत्ता मापन या भागासाठी उत्कृष्ट आहेत.

चौथा आठवडा:
परीक्षा जवळ आलेली असेल, www.indiabix.com या वेबसाईटवर जाऊन संगणकासमोर बसून बहुपर्यायी प्रश्न व नमूना प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.

परीक्षागृहात :
एक ओळखपत्र आणि परीक्षा तिकीट यांची झेरॉक्स प्रत आठवणीने सोबत ठेवा. एक चांगला पेन व शक्यतो स्वचलीत पेन्सिल सोबत ठेवा. परीक्षा केंद्रावर पंधरा मिनीट आधी बसवलं जातं.
संगणकासमोर बसल्यावर सर्व यंत्रणा सुरळीत आहे याची खात्री करून घ्या. दिलेल्या सर्व सूचना लक्षपूर्वक वाचा व ऐका. कच्च्या कामासाठीचा कागद हातात आल्यावर परीक्षा निरीक्षकाच्या लक्षात येणार नाही अशा बेताने आठवणारी महत्वाची सूत्रं पटापट लिहून काढा. विशेषतः Streams, trains, trignometry angles इ. ऐन वेळी उडणारा गोंधळ टाळण्याचा हा उत्तम पर्याय आहे.
तुमचा सराव चांगला झाला असल्यास तुमचे कच्चे व पक्के दुवे तुम्हाला माहीत असतील. प्रश्नपत्रिका समोर यायला दोन-चार मिनीट असतील तेव्हा दीर्घ श्वास घेऊन मन शांत करा.
स्वतःलाच बजावून सांगा. "आता नाही तर कधीच नाही!"

साधारणपणे या परीक्षांमध्ये तीन भाग असतात.
१. बुद्धीमत्ता मापन (aptitude) २० प्रश्न.
२. सामान्य अध्ययन (general knowledge) / व्यवस्थापन (management) २०/ ३० प्रश्न
३. तांत्रिक (Technical) ६०/५० प्रश्न
प्रत्येकी एक गुण असलेल्य १०० प्रश्नांसाठी ६० मिनीटे.
प्रत्येक प्रश्न वाचून उत्तर देण्यास सरासरी ३६ सेकंद.
ही वेळेशी स्पर्धा आहे.

सर्वात पहील्यांदा सामान्य अध्ययन आणि तांत्रिक भाग सोडवा. उणे गुणांकन पद्धत (negative marking) असेल तर हवेत गोळीबार करू नका. अगदी अचूक असणारे प्रश्न किती सूटलेत याचा अंदाज घेऊनच धोका पत्करा. एखाद्या उत्तराची खात्री नसेल तर त्यासाठी Marked for review चा पर्याय वापरा. शेवटी वेळ मिळाला तर ते पुन्हा पहा अथवा यंत्रणा आपसूकच ते उत्तर गृहीत धरते.
तांत्रिक आणि सामान्य अध्ययन यात दहा प्रश्न अनुत्तरीत राहीले तरी चालतील. उर्वरीत साठपैकी ४५-५० बरोबर आले आणि इतर चूकले तरी उणे गूणांकन होऊन ४० ते ४५ गुण मिळतील. बुद्धीमत्ता मापन हा सरावाने हमखास गूण मिळवून देणारा विभाग. यात वीसपैकी १५ गूण कमीतकमी मिळाले तर ५५ ते ६० गूण निश्चित मिळतील. उणे गूणांकन पद्धतीत ५५ गूण ही यशाची खात्रीच. उरलेला भाग रीक्त पदांची संख्या आणि तुमचं नशिब यावर अवलंबून आहे.

सोबतीने:
१. रोज सकाळी रात्रभर भिजवलेले दोन-चार बदाम खा. तेलकट, सुस्ती आणणारे पदार्थ टाळा. वर्ज्य नसल्यास उकडलेल्या अंड्यांचा पांढरा भाग खा. भरपूर पाणी प्या.
२. थोडा बदल म्हणून किंवा विश्रांतीच्या काळात मेडीटेशन (ध्यानधारणा) संगीत आवर्जून ऐका. आवडत नसल्यास बिथोवेन , मोत्झार्ट आदींच्या संगीतरचना ऐकणे. ओळखीचं संगीत / चित्रपट संगीत ऐकताना विचार भरकटत कुठेही जातात. तो धोका सुचवलेल्या संगीताने टळतो.

प्रत्येकाची अभ्यासाची एक विशिष्ट शैली असते. मला यश मिळवून देणाऱ्या सर्व गोष्टी मी या ब्लॉगमार्फत तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
°°°°°° सर्व परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा °°°°°
No comments:
Post a Comment