"भाषा" असं म्हटलं की काय जाणवतंय? जरा १ मिनीट थांबून चिंतन करा...
साहजिकच काही वेगवेगळ्या लिप्या , त्यातील अक्षरं तरळून गेल्या असतील. कदाचित काही उच्चार,हेलसुद्धा कानात घुमत असतील. जनूकांतून आलेले व भूतकाळात साठलेले असे "भाषा" या शब्दाशी जोडले गेलेले काही अनुभव मेंदू तुमच्या स्मृतीपटलावर सादर करेल.
पण, भाषा म्हणजे फक्त लिपी किंवा उच्चार एवढंच मर्यादीत प्रकरण नाही.
व्यापक अर्थाने 'भाषा' हे कोणत्याही प्रकारचं दोन वा अधिक गोष्टींमधिल संवादाचं अथवा सूचनांच्या देवाणघेवाणीचं माध्यम/साधन असं म्हटलं जाऊ शकतं. आपल्या शरीरातील असंख्य प्रक्रीया विविध रसायनं आणि विद्यूतकणांच्या माध्यमातून केल्या जातात. याचा अर्थ आपले डोळे व आपला मेंदू यांची विद्युतधारा ही भाषा आहे. अनुवांशिकतेच्या बाबतीत डीएनएची एक स्वतंत्र भाषा आहे, ज्यात लक्षावधी वर्षांपासून प्रगत होत आलेली आज्ञावली लिहीलेली असते.
उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यात विद्यूतप्रभार आणि विविध तरंगलांबीच्या रेडीओ लहरी या संवादाचं माध्यम राहील्या असाव्यात. आजही बहुतांश पक्षी व किटक तरंगांच्या माध्यमातून संवाद साधतात. काळाच्या ओघात या संवादासाठी आवश्यक असणारे अवयव आणि संवेदना (Senses) माणसाने गमावले असावेत. पण, तंत्रविज्ञानाच्या सहाय्याने आपण त्या पुन्हा मिळवू शकतो किंवा नविन संवेदनांसाठी मेंदूला तयार करू शकतो.
त्यानंतरच्या टप्प्यात शारीरिक खाणाखूणा आणि आवाजी इशारे पृथ्वीवासियांनी तयार केले असावे. आजही जमिनीवर वावरणा-या जनावरांच्या जीवनशैलीचा हलकासा अभ्यास केला, तरीही हे प्रकरण समजून येईल. इतकंच कशाला आपली 'देहबोली' (Body language ) हे कशाचं निदर्शक आहे?
उत्क्रांतीच्या सर्वात आधुनिक टप्प्यात मानवाने प्रथम चित्रलिपी व सांकेतिक चित्रे तयार केली असावी. चीनी भाषेत आजही वस्तू-निदर्शक सांकेतिक चित्रलिपीचा वापर होतो. यात पुढील टप्प्यावर वस्तूंऐवजी उच्चारांना सांकेतिक चित्र देण्याचा प्रयोग झाला व लिपी या प्रकाराचा जन्म झाला. जगभरात थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या लिप्यांचा विकास झाला. त्यातील काही विद्वानांनी लिपींमध्ये भर घालणे थांबवून शक्य ते सर्व उच्चार उपलब्ध सांकेतिक चित्रं (अक्षरं) एकमेकांच्या सोबतीने गुंफून वाक्यरचना तयार करण्याचा प्रघात पाडला. यामुळेच विविध लिपींमध्ये वेगवेगळ्या अक्षर रचना व अक्षरांच्या असमान संख्या पहायला मिळतात.
This blog is not dedicated to a specific purpose. The blogger wanders through many fields and expresses his experiences in his style.
Search This Blog
Tuesday, June 30, 2015
भाषा:उत्क्रांती आणि भाषा {२६.०६.२०१५}
Labels:
भाषा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment