Search This Blog

Saturday, July 16, 2011

एक आशावाद!

प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर वर्तमान पत्रांमध्ये पाने भरभरून सल्ले दिले जातात.-सरकारला आणि नागरिकांना सुद्धा! "हे करायला पायजेल, ते करायला पायजेल " या प्रकारात माझी पण भर मी आता टाकतोय.
 
हरेक अतिरेकी कृत्यानंतर भारतीय नागरिकांच्या सहनशीलतेचा कडेलोट होतो पण त्याचा अंत मात्र होत नाही. कारण त्यातील बहुतेक जण दैववादी, हतबल नाहीतर आळशी यापैकी एका प्रकारात मोडतात.

खरतर नागरिक संघटनांकडून प्रभावी कार्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण आपल्याला बॉस आणि बायको सोडून इतरांच्या आज्ञा झेलणे कमीपणाचे वाटते. त्यात या कार्यात कोणी किती वेळ आणि पैसा टाकायचा यावरून होणारे वाद सार्वत्रिक आहेत. या उलट, अतिरेकी संघटना आणि गुंडांच्या टोळ्यांमध्ये कमालीची सुसूत्रता असते. त्यामुळे ते त्यांचे बेत तडीस नेतात.
 
गुंडांचे काम ते व्यावसायिकपणे करतात, तर समाजकार्य करणार्यांना किमान लोकांच्या प्रशंसेची गरज वाटते किंवा इतर वैयक्तिक फायदे उठवण्याची इच्छा होते. 

या सर्व कारणांमुळे मला सर्वांसाठी  सक्तीचे सैनिकी प्रशिक्षण प्रभावी उपाय वाटतो. कारण 
१. अश्या प्रशिक्षणामुळे मुळची भीती नक्की कमी होते.
२. एकत्र येऊन काम कसे करायचे याचा सराव होतो.
३. शस्त्रे हाताळण्याचे प्राथमिक शिक्षण मिळते. (जर बाजूला एखादा पोलीस बेशुध्ध होऊन पडला असेल तर त्याच्या बंदुकीने कसाब सारख्याचा वेध घेण्याचा आत्मविश्वास तरी येईल )
४. सर्वात महत्वाचे, गर्दीत आपल्याच धुंदीत राहण्यापेक्षा सतर्क राहण्याचे महत्त्व लक्ष्यात येईल. 
सैनिकी प्रशिक्षणाने प्रत्येक नागरिक एक स्वतंत्र लढवय्या बनेल, जो वेळ पडल्यास त्वरेने आपला चमू बनवून परिस्थितीवर ताबा मिळवू शकेल, हा माझा आशावाद आहे .

No comments:

Post a Comment