प्रीन्सीला आणि मला, आमची मुलगी 'मॕक्स' हीचं या जगात स्वागत करण्यास फार आनंद होत आहे.
तिच्या जन्माच्या निमित्ताने, आम्ही ती ज्या प्रकारच्या जगात मोठी व्हावी अशी अपेक्षा आम्ही करतोय त्याबद्दल तिला एक पत्र लिहिले आहे.
हे एक असं जग आहे जिथे आमची पिढी-- आजारांवर उपचार शोधून, प्रत्येकाच्या आवडीनुसार/कुवतीनुसार शिक्षण देऊन, प्रदुषण न करणाऱ्या उर्जास्रोतांच्या वापरातून, लोकांमधील सुसंवाद वाढवून, मजबूत समाज निर्माण करून, गरीबी कमी करून, सर्वाना समान अधिकार देवून आणि राष्ट्रा-राष्ट्रांमधिल समंजसपणा वाढवून - मानवी क्षमता आणि समता यांचा विकास करू शकते.
आम्ही हे जग सर्व लहान मुलांसाठी सुखद बनवण्यासाठी आमचं छोटसं योगदान देण्यास कटीबद्ध आहोत. आमच्या पुढील आयुष्यात, आम्ही 'फेसबूक' मधील आमचे ९९% समभाग (शेअर्स) ज्यांची आजघडीची किंमत ४५ बीलीयन डॉलर्स (साधारणतः २.९९ लाख कोटी रुपये) इतकी आहे, ते इतरांच्या सहकार्यांने जगाच्या उत्कर्षासाठी देण्याचे निश्चित केलं आहे.
प्रीन्सीलाच्या गर्भावस्थेदरम्यान दिलेल्या प्रेम आणि आधाराकरीता या समुदायातील सर्वांना धन्यवाद. आपण सर्वांनी आमच्या मनात आपण मॕक्स आणि सर्व मुलांसाठी हे जग एकत्र येवून घडवू शकतो अशी आशा निर्माण केली आहे.
:::::::::::::::::
लाडक्या मॕक्सला,
तू (तुझ्या येण्यामुळे) आम्हाला भविष्याबद्दल जी आशा दाखवली आहेस, तिचं वर्णन करण्यासाठी तुझ्या आईकडे आणि माझ्याकडे अजूनही शब्द नाहीत. तुझं भवितव्य निश्चित उज्वल आहे, आणि आमची अशी सदीच्छा आहे की तू निरोगी व सुदृढ व्हावंस जेणेकरून ते आशादायक आयुष्य तुला छानपैकी उलगडता यावं. तू ज्या प्रकारच्या जगात जगावं, असं आम्हाला वाटतं त्यावर विचार करण्याचं कारण तू आधीच आम्हाला दिलं आहेस.
इतर सर्व पालकांप्रमाणे आम्हालाही वाटतं की तू आज आमचं जे जग आहे त्यापेक्षा सुधारीत जगात जगावं.
बातम्यांचे मथळे जगात काय चूकीचं चाललं आहे यावर जास्त लक्ष देत असले, तरीही कितीतरी बाबतीत जग चांगलं बनत आहे. आरोग्यमान सुधारतंय. गरीबी आक्रसतेय. ज्ञानभंडारात वाढ होतेय. लोकं जोडली जात आहेत. प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा प्रगतीचा अर्थ असा आहे की तुझं आयुष्य आमच्या आजच्या जगण्यापेक्षा कितीतरी पटींनी सुखकर असेल.
यासाठी आम्ही फक्त तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी आमचं योगदान देणार नाही, तर जगातील पुढे येणाऱ्या पिढ्यांप्रती एक नैतिक जबाबदारीही आम्हाला पार पाडायची आहे.
प्रत्येकच जीव मोलाचा आहे, असे आम्ही मानतो आणि त्यात भविष्यकाळात आजपेक्षा कितीतरी जास्त असणाऱ्या जीवांचा (लोकसंख्येचा)ही समावेश होतो. आजच्या वैश्विक समाजाची ही जबाबदारीच आहे की आपण आज जे जीव जगत आहेत त्यांच्याइतकंच भविष्यात वाढ होणाऱ्या जीवांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
पण आजघडीला आपण सारे स्रोत तुमच्या पिढीसाठीच्या संधी आणि अडचणींकडे एकत्रितपणे थेट वळवत नाही आहोत.की येत्या काही महीन्यात देऊच जसं की, आजार/रोग. आज आपण आजारीच पडू नये, यासाठी केल्या जाणाऱ्या संशोधनांपेक्षा ५० पट जास्त खर्च आजारी माणसांच्या उपचारांसाठी जास्त महत्व देऊन करतो.
औषधे आणि वैद्यकशास्त्र हे खऱ्या अर्थाने विज्ञान म्हणून गेल्या केवळ शंभर वर्षात पुढं आलं आहे आणि या छोटाश्या काळातच आपण काही रोगांवर पूर्ण विजय मिळवला आणि काही आजारांवर बऱ्यापैकी उपचार शोधले.
येत्या शंभर वर्षात तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे आपण सर्व किंवा बहुतांश आजार रोखणे, बरे करणे किंवा त्यांचं व्यवस्थापन करणे यात यश मिळवलेलं असेल.
सध्या बरेचसे नागरीक - हृदयविकार, कर्करोग , मेंदूचे विकार, मेंदूवरील आघात आणि संसर्गजन्य रोग या पाच आजारांमुळे मरण पावतात आणि यावर तसेच इतर आव्हानांवर आपण अतिशय वेगाने मार्ग काढू शकतो.
एकदा का तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या पिढीला या आजारांचा उपद्रव होवू नये , याची जाणिव झाली की आमच्या पिढीचं हे कर्तव्यच आहे - भविष्याचा विचार करून हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सारी गुंतवणूक या बाजूला वळवावी. तुझी आई आणि मी यात आमचं योगदान देऊ इच्छितो.
आजारांवर उपचार करण्यात वेळ खूप जातो. पाच किंवा दहा वर्षांच्या छोट्याशा काळात आपण फार काही मिळवलं असं दिसणार नाहीय. पण एका मोठ्या काळानंतर आपल्या प्रयत्नांना फळं येतील आणि एक दिवस, तुम्ही किंवा तुमची मुलं ते वास्तव पाहू शकता ज्याची आम्ही केवळ कल्पनाच करू शकतो : आजारांच्या त्रासापासून मुक्त असलेलं जग!
या शक्यतेसारख्या इतरही काही संधी आहेत. जर आजच्या समाजाने आपली बहुतेक ताकद या मोठ्या अडचणींविरोधात एकवटली, तर आम्ही तुमच्या पिढीसाठी एक आरामदायी जग मागे सोडून जाऊ.
°°°
तुमच्या पिढीसाठीच्या आमच्या सदीच्छा दोन मुख्य संकल्पनांवर केंद्रीत आहेत : मानवी क्षमतांची प्रगती आणि समतेचा पुरस्कार.
मानवी क्षमतांची प्रगती म्हणजे मानवी जीवन किती भव्य होऊ शकतं यावरील मर्यादा दूर करण्याचा प्रयत्न.
तुम्ही आमच्याहून १०० पट अधिक गोष्टी शिकू व अनुभवू शकता का?
आमची पिढी आजारांवर उपचार शोधू शकेल का जेणेकरून तुम्ही अधिक निरोगी व दीर्घायुष्य जगू शकाल?
आम्ही हे जग अशा पद्धतीने जोडू शकतो का, की प्रत्येक कल्पना, माणूस आणि संधीपर्यंत पोहोचता येईल?
आम्ही अधिकाधिक प्रदुषणविरहीत उर्जा मिळवू शकतो का ज्यामुळे आम्हाला पर्यावरणाच्या काळजीपोटी ज्या गोष्टींवर संशोधन करता येत नाही ते तुम्ही करू शकाल?
आम्ही उद्योजकतेला अशा प्रकारे चालना देवू शकतो का की जागतिक शांतता व समृद्धी वाढवण्यासाठी तुम्ही कोणताही उद्योग उभारू शकता व कोणतीही कोडी सोडवू शकता?
समतेचा पुरस्कार म्हणजे प्रत्येकाला या संधी उपलब्ध असल्या पाहीजेत - ज्यात त्याचा देश, नागरीकत्व , कुटूंब किंवा परीस्थितीचा कोणताही अडसर येता कामा नये.
समाजाने हे काम फक्त न्यायासाठी किंवा दान म्हणून न करता मानवी प्रगतीच्या उदात्त हेतूसाठीच केलं पाहीजे.
आज आपण कितीतरी जणांच्या जबरदस्त क्षमतांना मुकतो आहोत. या क्षमता वापरण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रत्येकाची ती नैसर्गिक हुशारी, संकल्पना आणि वैयक्तिक मेहनत यांना नीट रस्ता दाखवणं.
आमची पिढी गरीबी आणि उपासमारी नष्ट करू शकते का?
प्रत्येकाला मुलभूत आरोग्य सेवा देणं आम्हाला शक्य आहे का?
आम्ही समंजस आणि खेळीमेळीने रहाणारे समाज बांधू शकतो का?
विविध राष्ट्रांतील नागरीकांमध्ये आम्हाला शांतताप्रिय आणि समजूतदार नातेसंबंध जोडता येतील का?
स्त्रीया, मुले, आदिवासी व विस्थापित अशा सर्वांना आम्ही स्वावलंबनाची ताकद पुरवू शकतो का?
जर आमच्या पिढीने गुंतवणूकीसाठी सुजाण निर्णय घेतले तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सकारात्मक आहे-- आशा करूया की तुमच्याच जीवनकाळात.
°°°°°
हे ध्येय : मानवी क्षमतांची प्रगती आणि समतेचा पुरस्कार - या ध्येयाप्रती सर्वांनीच काम करण्याची नवी मानसिकता गरजेची आहे.
आम्ही खूप मोठ्या काळासाठी ; २५, ५० किंवा बहुदा १०० वर्षांसाठी गुंतवणूक केली पाहीजे. सर्वात मोठी आव्हानं मोठ्या काळाच्या क्षितीजावरच संपू शकतात आणि त्यांना लहानसहान विचारांनी भिडता येणार नाही.
आम्हाला ज्यांची सेवा करायची आहे त्यांच्याशी आम्ही थेट मिसळलं पाहीजे. आम्हाला त्यांच्या आकांक्षा व गरजा समजल्या नाहीत तर त्यांना योग्य ती ताकद देणे कदापि शक्य होणार नाही.
आम्ही आश्वासक बदल घडवून आणणारं तंत्रज्ञान उभारलं पाहीजे. कित्येक मंडळं यात पैसा ओततात पण बहुतेकदा प्रगती ही सृजनशील कामांच्या प्रभावामुळे होते.
आम्ही धोरणं आखणं आणि उपयुक्त वाद-संवाद करणं यात सहभाग वाढवला पाहीजे. कित्येक संघटनांना हे मान्य होणार नाही पण प्रगती ही शाश्वत काळ टिकण्यासाठीच्या चळवळींवर आधारलेली हवी.
आपण त्या-त्या क्षेत्रातील सर्वात सशक्त आणि स्वतंत्र बुद्धीच्या नेतृत्वाला पाठबळ दिलं पाहीजे. ध्येय गाठण्यासाठी तज्ञांशी भागिदारी करणं हे एकट्यानंच वाटचाल करण्यापेक्षा फार प्रभावी आहे.
उद्यासाठी उपयोगी गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला आज जोखीमीची कामं करणं भाग आहे. आपण नुकतंच शिकू लागलो आहोत आणि आपण मेहनत केलेल्या कित्येक गोष्टी घडत नाहीत, तरीही आपण ऐकूया, शिकूया आणि शहाणे होऊ या.
°°°°
आमचं वैयक्तिक शिक्षण, इंटरनेटचा वापर, सामाजिक शालेय शिक्षण आणि आरोग्य याबाबतचे अनुभव यांवर आमचं तत्वचिंतन उभं राहीलंय.
आमची पिढी शाळेच्या वर्गांतून वाढली जिथे आमच्या आवडी-निवडी आणि कुवत यांचा विचार न होत्या सारख्याच गोष्टी एकसारख्याच वेगाने शिकवल्या गेल्यात.
आमची पिढी तुम्हाला काय बनायचं आहे ते जाणून त्याप्रमाणे ते ध्येय ठरवेल- जसं की इंजीनीयर, आरोग्य सेवक, लेखक की सामाजिक नेता. तुमच्यापाशी ते तंत्रज्ञान उपलब्ध असेल जे तुम्ही कोणत्या पद्धतीने चांगलं शिकू शकता आणि तुम्ही कुठे लक्ष देण्याची गरज आहे ते समजून घेईल. तुमच्या सर्वात आवडीच्या विषयांमध्ये तुम्ही पटकन गती पकडाल आणि तुम्हाला गरजेचं वाटेल त्या भागासाठी तुम्हाला हवी तितकी मदत मिळेल. आज ते शाळा-कॉलेजात उपलब्ध ही नाहीत, असे विषय तुम्ही अभ्यासणार आहात. तुमच्या ठरवलेल्या ध्येयाकडे घेऊन जाण्यासाठी तुमच्या शिक्षकांकडे अधिक चांगल्या सुविधा आणि दर्जेदार माहीतीचा साठा असणार आहे
याहून भारी म्हणजे, जरी एखाद्या चांगल्या शाळेपाशी नसले तरीही, जगभरातील विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक पातळीवर शिक्षण सोपं करणाऱ्या इंटरनेटवर आधारीत उपकरणांचा आधार असणार आहे. अर्थातच, प्रत्येकाला आयुष्यात योग्य सुरुवात मिळण्यासाठी तंत्रज्ञानाहून कितीतरी अधिक गोष्टींची गरज आहे. पण, वैयक्तिक शिकवण हा एक प्रत्येक बाळाला उत्तम शिक्षण आणि अधिक समान संधी मिळवून देण्याचा एक श्रेयस्कर मार्ग आहे.
आम्ही हे तंत्रज्ञान बांधायला नुकती सुरुवात करतो आहोत आणि निकाल फार आशादायक आहेत. विद्यार्थी फक्त परीक्षांमध्येच चांगले गुण प्राप्त करत नाहीयत तर ते त्यांना जे शिकायचं आहे त्या दृष्टीने कौशल्य आणि आत्मविश्वासही मिळवत आहेत. आणि ही फक्त प्रवासाची सुरूवात आहे. तू शाळेत जाऊ लागशील तेव्हा तंत्रज्ञान आणि शिकवण्याच्या पद्धती दरवर्षी झपाट्याने प्रगती करतील.
तुझ्या आईने आणि मी दोघांनीही शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि हे सर्व घडून येण्यासाठी काय लागतं याची आम्हाला जाणिव आहे. वैयक्तिक शिकवणीचा जगभरातील शाळांमध्ये प्रसार होण्यासाठी आम्हाला ताकदवान शैक्षणिक तज्ञांची सोबत लागेल. समाजामध्ये मिसळावं लागेल ज्याची सुरूवात आम्ही आपल्या सॕनफ्रॕन्सीस्को बे एरीयातून करत आहोत. यासाठी नवं तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पना घडवाव्या लागतील. आणि यासाठी चूका कराव्या लागतील आणि चूकांपासून धडे घेत आपल्या ध्येयाकडे जावं लागेल.
एकदा का आम्हाला समजलं की आम्हाला तुमच्या पिढीसाठी कशा प्रकारचं जग बनवायचं आहे, नंतर आमची एक समाज म्हणून ही जबाबदारीच आहे की या ध्येयाशी सुसंगत गुंतवणूक करणे.
सामुदायिकरित्या , आम्ही हे करू शकतो. आणि आम्ही जेव्हा हे करू, वैयक्तिक शिक्षण हे फक्त चांगल्या शाळांमधील मुलांपुरतं उपयोगी न राहता , इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकासाठी समान संधी उपलब्ध करून देणारं असेल.
°°°°
फक्त तंत्रज्ञानाने प्रश्न सुटणार नाहीत. एक सुखकर जग बनवण्याची सुरूवात निरोगी आणि सशक्त समुदाय बांधण्यातून होते.
मुलांना सर्वांगिण शिक्षणातून चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात. आणि ते तेव्हाच चांगलं शिकतात जेव्हा त्यांची तब्बेत सुदृढ असते.
आरोग्याची सुरूवात लवकर होते -- प्रेमळ कुटूंबासोबत, सकस आहार, आणि स्थिर, सुरक्षित वातावरणात..
लहान वयात धक्कादायक अनुभवांना सामोरं गेलेल्या मुलांची बौद्धिक व शारीरीक वाढ खुंटते. संशोधनांतून असं समोर आलंय की मेंदूच्या वाढीतील बदलांमुळे शिकण्याच्या कुवतीवर विपरीत परीणाम होतो.
तुझी आई एक डॉक्टर आणि शिक्षीका आहे. तिने हे सर्व पाहीलेलं आहे.
जर तुम्ही घरभाडं की जेवण या विवंचनेत असाल, किंवा शोषण आणि गुन्ह्यांबाबत भयभीत असाल, तर तुम्हाला तुमची पूर्ण क्षमता वापरणं शक्यता होत नाही.
जर तुम्हाला भिती वाटत असेल की तुमच्या शरीराच्या रंगामुळे तुम्ही कॉलेजऐवजी तुरुंगात जाल, किंवा तुमच्या (नागरीकत्वाच्या) कायदेशीर वैधतेमुळे तुमच्या कुटूंबाला हाकललं जाईल, किंवा तुमच्या धर्मामुळे, लैंगिकतेमुळे तुम्हाला हिंसेला बळी पडावं लागेल.. तर तुम्हाला तुमचं ज्ञान वापरणं अवघड होतं.
आपल्याला हा सर्व गुंता समजून काम करणाऱ्या संस्थांची गरज आहे. तुझी आई जी नव्या प्रकारची शाळा साकारतेय तिचा हा तात्विक पाया आहे.
शाळा, आरोग्य सुविधाकेंद्रे, पालक समूह आणि स्थानिक प्रशासनांशी भागिदारी करून आणि सर्व लहान मुलांना सकस आहार मिळतो आहे , त्यांना वात्सल्यभावनेनं वाढवलं जातं आहे याची खात्री करून, आपण हे सर्व काम जोडलेलंच आहे असं मानू शकतो. तेव्हाच आपण सर्वांना समान संधी देण्याची एकसंध सुरूवात केली असं म्हणू शकू.
या प्रारूपाला संपूर्णपणे कार्यान्वीत करायला कित्येक वर्ष लागतील. हे एक अजून उदाहरण आहे की , कशा पद्धतीने संपूर्ण मानवी क्षमतेचा वापर करणं आणि समान संधी मिळणं एकमेकांशी घट्ट बांधलेले आहेत. आपल्याला यापैकी काही साध्य करायचं तर आपण आधी सर्वसमावेशक आणि निरोगी सशक्त समुदाय निर्माण केले पाहीजेत.
°°°°°
तुमची पिढी एका सुधारीत जगात जगावी म्हणून आमच्या पिढीने करण्यासारखं फार काही आहे.
आज, तुझी आई आणि मी, आमचं आयुष्य या आव्हानांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आमचं योगदान देण्यासाठी खर्च करू अशी शपथ घेतो. मी फेसबूकचा मुख्याधिकारी (CEO) म्हणून येती खूप वर्ष काम करणार आहे, पण हे इतके महत्वाचे मुद्दे आहेत की तू किंवा आपण अजून मोठे होऊन काम करेपर्यंत थांबणं शक्यच नाही. आमच्या तरूणवयात काम सुरू करण्याने त्याचे दृश्य परीणाम पाहता येतील, अशी आम्हाला आशा आहे.
तू चॕन-झूकरबर्ग घराण्यांची नवीन पिढी सुरू केली असल्याने आम्हीही इतरांच्या सोबतीने येणाऱ्या पिढ्यांसाठी क्षमता विकास आणि समता स्थापन करण्यासाठी 'चॕन झूकरबर्ग इनीशीएटीव्ह' सुरू करत आहोत. सुरूवातीला आमचं लक्ष वैयक्तिक शिकवणी, आजारांवर उपचार, लोकसहभाग आणि सशक्त समाजबांधणी यावर केंद्रित असणार आहे.
आम्ही आमचे फेसबूकमधील ९९% समभाग या कामासाठी आमच्या आयुष्यभरात देणार आहोत. आम्हाला माहीती आहे, जे या कामासाठी आधीपासूनच योगदान व स्त्रोत देत आहेत त्या तुलनेत ही रक्कम छोटी आहे. पण, इतरांच्या सोबत आम्ही या ध्येयासाठी जे काही करू शकतो ते करू इच्छितो.
याबाबतचे तपशील आम्ही एकदा आमच्या नविन कौटुंबिक आयुष्याचा जम बसल्यावर आणि आमच्या पालकत्वाची सुटी संपल्यानंतर येत्या काही महीन्यात देऊच. आम्हाला माहीत आहे, आम्ही हे सर्व का करतोय आणि कशा पद्धतीने करणार आहोत याबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
आम्ही आमच्या पालकत्वाद्वारे आयुष्याच्या एका नव्या पैलूला सामोरं जातानाच या सर्वात आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.
आम्ही हे करु शकतो कारण आमच्या मागे जागतिक जनसमूदायाची एक प्रचंड ताकद उभी आहे. फेसबुकमुळे हे जग नव्या पिढ्यासाठी सुधारण्याचे असंख्य स्त्रोत निर्माण झालेत. फेसबुकवरील प्रत्येक सदस्य यात आपलं योगदान देत आहे.
आम्ही या संधीकडे वाटचाल करू शकतो कारण आम्ही आमच्या मार्गदर्शकांनी, तज्ञांनी, गुंतवणूकदारांनी आणि इतर कित्येक जबरदस्त व्यक्तींनी दिलेल्या योगदानाच्या भक्कम पायावर उभे आहोत.
आणि आम्ही या जनसेवेच्या व्रताला हात घालू शकतोय कारण आमच्या सोबत असलेले आमचे प्रेमळ कुटूंबिय, आधार देणारे मित्र आणि अजोड सहकारी. आम्हाला विश्वास आहे असे सखोल आणि प्रेरणादायी नातेसंबंध तुलाही तुझ्या जीवनात मिळतील.
मॕक्स, आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आमची एक भव्य जबाबदारी आहे की तुझ्यासाठी आणि इतर सर्व मुलांसाठी एक छान जग पाठी सोडून जावं. तू आम्हाला दिलेल्या प्रेम, आशा आणि आनंदाइतकंच सर्वकाही तुलाही मिळो अशी, आम्ही सदीच्छा करतो. तू या जगाला काय देतेस ते पाहण्यासाठी आम्ही अगदी आतूर की येत्या काही महीन्यात देऊच.
तुझेच,
आई आणि बाबा.